.... यांनाच घेणार मुख्यमंत्री पक्षात | Devendra Fadnavis | Vinod Tawde | BJP

2021-09-13 1

विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका विद्यापीठाच्या कॅपसबाहेर घेण्यास हरकत नाही परंतु विद्यापीठात राजकीय भूमिका नकाे. असा सल्ला शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली तयार केली असून त्यात विद्यार्थ्यांनी कुठलिही राजकीय भूमिका घेऊ नये तसेच सरकार शासनविरोधी कृत्य करू नये असे म्हंटले आहे. तसेच राष्ट्र-विरोधी,समाज व जातीय विरोधी व राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नियमांच्या विराेधात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


आज तावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नियमांबद्दल विचारले असता विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका ही विद्यापीठाच्या बाहेर घ्यावी. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी काय म्हणायचे असेल तर त्याची संधी त्यांना असणार आहे. विद्यापीठात कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार हाेता कामा नये. विद्यार्थ्यांना राजकीय भूमिकेशिवाय विद्यार्थ्यांचे नेतृत्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर करता आले पाहिजे. आमच्यावेळी आम्ही जी आंदाेलने केली ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केली. आणि राजकीय आंदाेलने अलका टाॅकीज चाैकात केली. दाेन्हींची गल्लत आम्ही केली नाही. असे ते म्हणाले.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Free Traffic Exchange

Videos similaires